Marathi Kavita For Wife | Poems for Wife | Love Poems

Marathi Kavita for Wife | Poems for Wife | Marathi Love Poems


लक्ष्मी - बायकोसाठी मराठी प्रेम कविता


marathi kavita on wife | poems for wife | marathi love poems
Marathi Kavita For Wife


रूणझुण रूणझुण तुझ्या पायातील पैंजण...

किणकिण किणकिण तुझ्या हातातील हिरवा चुडा...

यानेचं मला रोज जाग येते

भल्या सकाळी तु अंगणात

लक्ष्मीचं वावरलेली दिसते...




बायकोसाठी मराठी प्रेम कविता


हलक्या पावलांनी आली तु माझ्या आयुष्यात 

पण खरं सांगु का तु माझं आयुष्यचं होऊनी गेलीस...

तु माझ्या आयुष्यातील एक छान स्वप्न आहेस

मला हे स्वप्न कधीच न संपावसं वाटतं...

तु जेव्हा हसतेस 

खरं सांगु तुला मी हसल्यासारखं वाटतं...

रोज तुझ्या नाकावरचा राग पाहण्यासाठी

मला रोज खोट खोट भांडावसं वाटतं...

कधी कधी रस्त्यातही हसतो मी गालात

कुणास ठाऊक कुणाच्या असतो मी ध्यानात

तु आलीस माझ्या आयुष्यात 

आणि माझं आयुष्यचं बदलून गेलं

तुझ्यावर आहे माझं अविरत प्रेम जडलं...




बायकोसाठी मराठी प्रेम कविता - सोबती 


आयुष्यातील आपण खरे सोबती

सोबत असेल तुला माझी प्रत्येक वळणावरती... 

आयुष्यात येतील सुख, दुख

पण, घाबरु नकोस मी असेल तुझ्याचं बरोबर 

प्रत्येक वळणावरती... 

कधी भेभान वादळही असेल

पण, घाबरु नकोस त्या वादळाशी झुंजायला

आपण असू सोबत कायमचे घेऊनी हाती

दिवा आणि पणती...



प्रिय सखी - बायकोसाठी मराठी कविता


हे बघ सखी

तु आहेस माझी खरी सखी बायको

म्हणून तु थांबू नकोस,

तुला तुझं अस्तित्व आहे...

तुला तुझं आयुष्य आहे...

त्याचा मी आदर करतो

तुझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी

मी सदैव तुझ्या पाठीशी राहील

हे आज मी तुला वचन देतो...

 



तु मला खुप आवडतेस !


तुला एक सांगु

तु मला खुप आवडतेस !

यासाठी नाही की तु माझी काळजी घेतेस...

यासाठी की तु समाजासाठी

राब राब राबते...

याचा मला अभिमान वाटतो !




आयुष्य - बायकोसाठी मराठी प्रेम कविता


आयुष्य काय असते
हे खरोखर ठाऊक नाही मला
पण या आयुष्यात शेवटपर्यंत
साथ तुझीचं हवी मला
मी आयुष्य तुलाचं समजतो... 





ब्लॉगबद्दल :


या ब्लॉगमध्ये बायकोसाठी मराठी प्रेम कविता दिलेल्या आहेत. बायको साठी सुंदर कविता आणि त्या कविताचे फोटो दिले गेले आहेत. या कविता वाचा तसेच तुमच्या प्रतिक्रिया दयायला विसरु नका.





***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या