Marathi Poem on Science | Technology Poem in Marathi
![]() |
marathi poem on science |
कवितेबद्दल-
मराठी कविता – विज्ञान ही कविता वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे.सध्याचे युग हे विज्ञानयुग म्हणून ओळखले जाते. आपण सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे.सध्या सर्वत्र झपाट्याने विज्ञान क्रांती करत आहे. आपण सर्वांनी विज्ञानाचे स्वागत करायला हवे याच आशयाची ही कविता आहे.
विज्ञानवादी आम्ही ही विज्ञानाची लेकरे !
विज्ञान ! विज्ञान ! विज्ञान ! विज्ञान !
विज्ञानवादी आम्ही ही विज्ञानाची लेकरे !
विज्ञानाने घडविले आम्हाला
विज्ञानाने पोसिले आम्हाला
विज्ञान आमच्या नसानसांत
विज्ञान आमच्या रोमारोमांत
विज्ञान आमच्या घरोघरी
विज्ञान आमच्या दारोदारी
विज्ञानवादी आम्ही ही विज्ञानाची लेकरे !
![]() |
marathi poem on science |
विज्ञानाचे आम्ही वारकरी
विज्ञानाचे आम्ही सोबती
विज्ञानाचे आम्ही सांगती
विज्ञानवादी आम्ही ही विज्ञानाची लेकरे !
विश्वास ठेवू आम्ही स्वत:वर
विश्वास ठेवू आम्ही स्व:डोळयावर
विश्वास ठेवू आम्ही विज्ञानावर
विज्ञानवादी आम्ही ही विज्ञानाची लेकरे !
येणाऱ्या या पिढीला देऊ आम्ही
विज्ञानाचे ज्ञान हो !
धुळ मेंदूवरची सारून सारी
विज्ञानाचे करतो स्वागत हो ! स्वागत हो ! स्वागत हो !
विज्ञानाची पताका फडकू आम्ही वसुंधरावरी...
विज्ञान ! विज्ञान ! विज्ञान ! विज्ञान !
विज्ञानवादी आम्ही ही विज्ञानाची लेकरे
- कोमल जगताप
0 टिप्पण्या