Poem on India in Marathi | Marathi Kavita Desh Bhakti
कवितेबद्दल -
मराठी कविता - भारत माझा देश ही कविता आपल्या मातृभूमी विषयी प्रेम व्यक्त करत आहे.भारत माझा देश ही कविता मायभूमी प्रती प्रत्येक नागरिकाचेे कर्तव्य अधोरेखित करत आहे.
मराठी कविता – भारत माझा देश
भारत माझा देश
मला खूप खूप आवडतो !
मी या देशाचा पाईक
अशी मी मोठ्यांने गर्जना करीतो !
सुजलाम, सुफलाम
अशी माझ्या देशाची ख्याती
याचा मला अभिमान वाटतो !
तिंरग्याकडे मी अभिमानाने पाहतो
या भूमीवरती रक्त सांडीयले
शुर विरांनी...
त्यांना मी माझा प्रणाम करीतो !
तुमच्या सारखेच सामर्थ्य मी माझ्या
ह्रद्यात घेऊनी फिरतो
याचे मी सदैव भान ठेवून
सौजन्याने सर्वांशी वागतो !
या भूमीवर जन्माला आले
थोरविर ते महापुरुष
त्यांना मी अभिवादन करितो !
हा देश माझा आणि मी या देशाचा
एक सुसभ्य नागरिक
आज वचन देतो !
माझ्या या मायभुमीचा मी सदैव आदर करितो...
रंजल्या-गांजल्यांना मी मदत करतो...
आपण सारे बांधव मिळून एक फेर धरतो...
तिमिर होऊनी अंधारातून पुढे नेण्यासाठी
त्यांना मी एक नवी दिशा देतो...
मी या देशाचा नागरीक असण्याचे
सर्व कर्तव्य पार पाडतो
भारत माझा देश
मला खूप खूप आवडतो
मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो !
- कोमल जगताप
0 टिप्पण्या