Good Morning Marathi Kavita | Good Morning Poems in Marathi
कवितेबद्दल -
मराठी कविता शुभ सकाळ ( good morning ) या सर्व कविता या सकाळच्या निसर्गरम्य वातावरणावर तसेच सकाळच्या गोड आठवणींवर आधारित आहेत.
या सर्व कवितांच्या माध्यमातून सकाळच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
शुभ सकाळ मराठी कविता
शुभ सकाळ ही माझी तुझ्या
हसऱ्या चेहऱ्याने व्हावी...
शुभ सकाळ ही माझी तुझ्या
गोड गोड शब्दांनी व्हावी...
शुभ सकाळ ही माझी
तुलाचं पाहून व्हावी...
अंधातरी शब्दांची
माळ ओवून व्हावी...
![]() |
Good Morning Poems in Marathi |
शुभ सकाळ मराठी कविता
सगळे गेले रजेवर
घेऊन आले नवी शुभ सकाळ
चंदा गेला, चांदणे गेले
उगवली आहे शुभ सकाळ
प्रकाशाने अंधारावर पुन्हा: केली आहे मात
शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ
शुभ सकाळ मराठी कविता
गुलाबी ही सकाळ
नेसूनी आली पिवळा शालू
थवा पाखराचा आकाशी
लागला भिरभिरू
कोकिळाही गाते गाणे
ऐक माझ्या साजना
रोज रात होताना
घेऊनी ये नव्या आशेच्या
सुप्रभाताला...
शुभ सकाळ मराठी कविता
कोकिळेचे गीत आहे मधूर जरी
सकाळच्या प्रहरी शांतता
हसली हि लाजरी
आहे लाजरा मुखडा
हळुवार पसरतो दाही
रंगउधळीत येते स्वप्नपालवी घरी
0 टिप्पण्या