Marathi story for kids | Best New Marathi Stories For Kids

Marathi story for kids | Best New Marathi Stories For Kids


Marathi story for kids | Best New Marathi Stories For Kids | Sundar Marathi goshti | chan marathi stries for childern | Marathi story


नमस्कार मित्रांनो, मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये खुप खुप स्वागत. आपल्याला येथे मराठी कविता, मराठी फोटो तसेच मराठी गोष्टी (marathi story for kids) वाचनासाठी तसेच मराठी फोटो डाऊनलोड करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. 

आपल्या ब्लॉग मधील ही सर्वात पहिली लहान मुलांसाठी मराठी गोष्ट - हुशार मुंग्या ही आहे. वाचा आणि वाचत रहा लहान मुलांना सांगत रहा. 


लहान मुलांसाठी मराठी गोष्ट - हुशार मुंग्या (Marathi story for kids) 


एक छोटेसे गाव होते आणि त्या गावामध्ये चिंटू आणि चिंकी हे दोघे भाऊ आणि बहीण आपल्या आई-बाबांसोबत राहत होते. घरची परिस्थिती हालाखीची होती त्याचे आई-बाबा शेतकरी होते. शेतात काम केल्याशिवाय त्याचा उदरनिर्वाह होत नसे. चिंटू आणि चिंकीचे आई-बाबा रोज शेतात जाताना आपल्या मुलांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देत. चिंटू हा चिंकीचा मोठा भाऊ होता. आई चिंटूला चिंकीची काळजी घ्यायला लावत असे. चिंटू सुद्धा आपल्या बहीणीची खुप काळजी घेत. 

एक दिवस आई-बाबांना शेतातून घरी यायला उशीर झाला. काळे ढग आकाशात जमा झाले होते, वारा जोराचा सुटला होता. चिंटू आणि चिंकी आई-बाबांची वाट बघत सारखे रस्त्याकडे बघत होते. अचानक चिंटूचे लक्ष घरातील भिंतीवर गेले. भिंत खुप काळी दिसत होती. चिंटूने बारकाईने भिंतीकडे पाहिले तर भिंतीवर काळया मुंग्या खुप मोठ्या प्रमाणात फिरत होत्या. खुप घाई मध्ये आपले अन्न म्हणजे पांढरे ठिपक्यासारखे छोटेसे कण इकडे तिकडे पळवत होत्या. त्या मुंग्याना पाहुन खेळत असलेल्या चिंकीला आवाज दिला ," चिंकी इकडे ये ". चिंकीसुद्धा जोरात पळत आली. चिंटू तिला मुंग्या दाखवू लागला. 

त्या दोघांना एकच प्रश्न पडला. एकाच वेळी एवढया मुंग्या कशा काय ?  तेवढ्यात चिंकी बोलु लागली, " मला तर कधी कधी एक मुंगी जाताना दिसते आणि कधी कधी मुंग्याची रांग पण एवढया साऱ्या मुंग्या मी कधीच पाहील्या नाहीत, त्या आपल्याला चावणार तर नाहीत ना? ", चिंकी बोलु लागली. चिंटूने उत्तर दिले, "आई एकदा बोलली होती की काळया मुंग्या चावत नाहीत लाल मुंग्या जास्त चावा घेतात आणि या तर काळया मुंग्या आहेत म्हणजे या चावणार नाहीत ".  दोघेही भाऊ - बहीण मुंग्याकडे बघत होते आणि निरीक्षण करत होते. आता हळूहळू मुंग्या कमी होऊ लागल्या आणि काही काळाने दिसेनाशा झाल्या. 

चिंकी मात्र आपल्या दादाला प्रश्न विचारू लागली, " एवढया साऱ्या मुंग्या कुठे गेल्या असतील ?"  तेव्हा चिंटू म्हणाला, " त्याचे इथेच जवळ कुठेतरी घर असावे. " पण मात्र अजूनही चिंटूला दोन प्रश्न सतावत होते पहिला आईबाबा अजून का येत नाहीत आणि दुसरा एवढया मुंग्या कशा काय बाहेर आल्या. 

तेवढ्यात आईबाबा घरी आल्याची त्यांना चाहूल लागली. दोघेही आईबाबा कडे पळत गेले व उशीर का झाला विचारु लागले. तेवढ्यात आकाशात ढगांचा कडकडाट ऐकू येऊ लागला व सर्वानी घरात प्रवेश केला तोच मुसळधार पाऊस सुरू झाला. बाबा सांगु लागले, " अरे चिमुकल्यांनो माफ करा ! आज आम्हाला खूप उशीर झाला. आपल्या शेतात जे धान्य होते ते सुरक्षित ठिकाणी पोहचवावे लागले. पावसाने भिजले असते तर सर्व धान्य वायाला गेले असते. मग आपण सर्वांनी वर्षभर काय खाल्ले असते? "



Marathi story for kids | Best New Marathi Stories For Kids | Sundar Marathi goshti | chan marathi stries for childern | Marathi story


तेवढ्यात आई बोलली, " मी आपल्यासाठी पटकन जेवण बनविते ".  पण, चिंकी मात्र दुसऱा प्रश्न विचारण्यासाठी उतावीळ झाली होती. तिने आईला सांगितले, " आई आपल्या घरातील भिंतीवर फार मुंग्या होत्या खुप साऱ्या मी कधीही एवढया मुंग्या बघितल्या नव्हत्या. " तेवढ्यात चिंटूही चिंकींला दुजोरा देऊ लागला, " होय आई मी ही कधी एवढया मुंग्या बघितल्या नव्हत्या ". आईबाबाच्या लक्षात सर्व प्रकार आला. बाबा सांगु लागले, "हे बघा मुलांनो! आम्हाला शेतातून यायला कशामुळे उशीर झाला? " तेवढ्यात चिंटू बोलला," शेतातील धान्य शेतातून बाहेर काढायचे होते आणि सुरक्षित ठिकाणी पोचवायचे होते ". बाबा म्हणाले, " अगदी बरोबर... तसेच मुंग्यानाही त्याचे अन्न सुरक्षित ठिकाणी पोचवायचे होते कारण त्यांना सुध्दा पावसाच्या आगमनाचे नैसर्गिक रित्या समजले असणार ". आता चिंटू आणि चिंकींचे डोळे उघडले व झालेल्या सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. चिंटू मात्र अजूनही विचार करू लागला एवढया चिमुरड्या मुंग्या आणि त्यांना एवढे ज्ञान या तर फारच हुशार आहेत. 

आता कुठेतरी चिंटू आणि चिंकींला त्यांच्या प्रश्नांचे योग्य उत्तर मिळाले आणि दोघेही खुप खुश झाले आणि मुंग्याची मात्र चांगलीच तारीफ करू लागले. 

तात्पर्य  - निसर्गातील सर्वच प्राणी, पक्षी, कीटक यांना जीवन जगण्यासाठी लागणारी बौद्धिक क्षमता निसर्गाकडून जन्मतः प्राप्त झालेली असते. 

  



तुम्हाला ही (Marathi story for kids) गोष्ट अशी वाटली हे आम्हांला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी फार मोलाच्या आहेत. अशाच लहान मुलांसाठी मराठी गोष्टी (Marathi story for kids)
आणि मराठी कविता वाचण्यासाठी मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह पुन्हा पुन्हा भेट द्या. मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाइटचा नवीन मराठी गोष्टी लिहीण्याचा हा प्रथम प्रयत्न आहे. कृपया आपण आम्हाला काही सुचना असतील तर नक्की कळवा. आपण मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाइटला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या