Marathi Story For Kids | चिमुकले कोरोना योद्धे

Marathi Story For Kids | चिमुकले कोरोना योद्धेMarathi Stories For Kids | best Marathi stories for children  | moral Marathi stories for kids
नमस्कार माझ्या बालमित्रांनो... 

मी कोण तर तुमचीच मैत्रिण. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर अशी गोष्ट जी तुम्ही आणि मी रोजचं जगतो आहे. चला तर वेळ न घालवता सुरूवात करूया आजच्या आपल्या गोष्टीला.... 


गोष्टीचे नाव आहे - चिमुकले कोरोना योद्धे ( Marathi Story For Kids)आज खुप दिवसांनी शाळेची घंटा वाजली. तुरूतुरू तुमच्या सारखीच लहान मुले रांगेत वर्गात प्रवेश करू लागली. काही नाराज होती तर काही खुप आनंदीत होती. काही वेळाने वर्गात गोंधळ सुरू झाला. सगळी मुले इकडे-तिकडे उडया मारत होती. तेवढ्यात पवार मॅडमने वर्गात प्रवेश केला आज खुप दिवसांनी सर्वजण एकमेकांना जवळून पाहत होते. पवार मॅडम सर्वाच्या लाडक्या मॅडम होत्या. कारणही तसेच होते कारण पवार मॅडमच्या विज्ञानाच्या आणि कुतुहलाच्या गोष्टी मुलांना फार आवडायच्या. त्यामुळे मुलांना मॅडम आल्या की आनंद व्हायचा आणि खुप साऱ्या दिवसांनी पुन्हा नवीन गोष्टी ऐकण्याचा दिवस आला होता. मॅडमना पाहताच सर्वजण उठले व , "गुड मॉर्निंग मॅडम" म्हणाले. मॅडमनी सुद्धा हसुन मुलांना, " बसा, बसा मुलांनो ! " म्हणून प्रतिसाद दिला व शाळेत मुलांचे स्वागत केले आणि आता चांगल्याचं गप्पा रंगात आल्या. 

तेवढ्यात मॅडमचे लक्ष इमली कडे गेले. इमलीने तोंडाला मास्क लावला नव्हता. मॅडम म्हणाल्या, " इमली बाळा तोंडाचे मास्क नाही काढायचे. तुम्हाला तर माहीत आहे कोरोनाने जगभर किती थैमान घातले आहे. आपण सर्वांनी आपली काळजी घ्यायला हवी." तेवढ्यात रोहन म्हणाला, " पण मॅडम मला हे समजले नाही की, कोरोना नक्की आहे तरी काय आणि का तो आपल्याला एवढा त्रास देतोय ."  
मॅडम गालातल्या गालात हसल्या आणि म्हणाल्या, अरे मुलांनो कोरोना हा एक विषाणू आहे जो आपल्या डोळयाना दिसत सुद्धा नाही असे असंख्य जीवजंतू आपल्या आजूबाजूला फिरत असतात पण ते इतके घातक नसतात जेवढा हा कोरोनाव्हायरस घातक आहे. "

रिंकू बोलली, " मग मॅडम आपण या विषाणू पासून वाचण्यासाठी काय हो करायचं? "  मॅडमला मुलांचे कौतुक वाटले मॅडम सांगु लागल्या, "बघा मुलांनो याचे उपाय फार साधे साधे आहेत आणि आपण सर्वांनी ते अंगीकारायला हवेत. आपल्याला आईच्या हातचे जेवन, भाज्या, फळे, अंडी, मांस असं सर्व काही तुम्ही खायला हवं. हे सर्व घटक खाल्ल्यामुळे आपल्यामध्ये रोगांशी लढण्यासाठी प्रतिकार शक्ती निर्माण होते मग ती या जीवजंतुना आपल्या शरीरावर आक्रमण करू देत नाही आणि आक्रमण केले तरी लवकरात लवकर पळवून लावते. कारण आपल्यामध्ये पौष्टिक खाण्यामुळे ताकद येते म्हणजे आपण धष्टपुष्ट होतो. त्यामुळे तुमची आई सारखी ओरडत असते जेवण करा, जेवण करा ! व्यवस्थित जेवण केले की आपण मजबूत होतो आणि रोगराई आपल्या पासून दूर पळते. 

इमलीने तेवढ्यात मॅडमला विचारले ," एवढे सगळे झाले की झाले का मॅडम? " मॅडम बोलु लागल्या, " हे बघा मुलांनो आपल्या पुस्तकात तुम्हाला सांगितलेले असते साबणाने हातपाय स्वच्छ धुवावे, दररोज अंघोळ करावी, नखे कापावीत. तुम्हाला आम्ही सतत सांगत असतो ना तेच नियम आपण पाळायचे आहेत. येता जाता विनाकारण इकडे तिकडे हात लावू नये जसे की शाळेचा जिना, बिल्डिंगचा जिना... नेहमी मास्क वापरावे आणि हो गर्दी मध्ये जाणे टाळावे. एवढे सारे साधे नियम आपण पाळायचे आहेत. "

सारा वर्ग शांततेत मॅडमने सांगितलेल्या गोष्टी ऐकत होता. तेवढ्यात टण !! टण !! असा घंटेचा आवाज आला आणि सगळी शांतता क्षणात नाहीशी झाली कारण आता सर्वांची घरी जायची वेळ झाली होती. सर्वांनी मॅडमला बाय! बाय! केला आणि मॅडम मुलांना म्हणाल्या, " चला आता उद्या अजून साऱ्या गोष्टी आपण शिकू व आपल्या घरच्या मंडळींना शिकवू आणि कोरोना ला हरवू." क्षणात सर्व वर्ग मॅडमच्या डोळयासमोरून निघून गेला आणि मॅडम हसत ओझरत्या नजरेने पाहू लागल्या आणि मनात म्हणाल्या, "हे सुद्धा कोरोना योद्धेचं आहेत की बागडण्याच्या वयात घरात बसून कोरोनाशी लढत आहेत."
 

अजून मराठी गोष्टी वाचा - 

हुशार मुंग्या (Marathi Story For Kids) तर मुलांनो आपण या गोष्टींमधून काय शिकलात हे आम्हांला खाली कमेंट बाॅक्स मध्ये सांगायला विसरू नका... आणि हो तुमच्याही मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील हो ना? तर ते प्रश्न सुद्धा विचारु शकता पण ते खाली कमेंट बाॅक्स मध्ये... चला तर मग पुन्हा भेटु अशाच एका नवीन गोष्टी सोबत किंवा कवितेसोबत.... 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या