मराठी गोष्ट छोटीशी मदत | marathi story for kids with moral

मराठी गोष्ट छोटीशी मदत | marathi story for kids with moralनमस्कार माझ्या बालमित्रांनो, 
आज आपण बघणार आहोत, एक सुंदर अशी मराठी गोष्ट. गोष्टींचे नाव आहे छोटीशी मदत. 

Marathi story for kids- छोटीशी मदत
मराठी गोष्ट छोटीशी मदत | marathi story for kids with moral
Marathi storiesएक छोटेसे गाव होते. त्या गावांमध्ये शिवाली आणि शिवम नावाचे दोन बहिण भाऊ राहत होते. त्यांची परिस्थिती एकदम हलाखीची होती. आई कष्ट करून त्यांना सांभाळत होती. शिवाली आणि शिवमला बाबा नव्हते. एके दिवशी काय झाले शिवम व्हरांड्यात खेळत होता. शिवम अतिशय खेळकर मुलगा. तो खेळता खेळता जोरात खाली पडला आणि त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली. शिवमला आईने दवाखान्यात नेले. आईची महिनाभराची सर्व कमाई दवाखान्यात खर्च झाली. शिवमला दवाखान्यातून घरी आणले आता शिवमच्या आई जवळ काहीच पैसे उरले नव्हते. ही सर्व परिस्थिती शिवाली समजत होती. आईला रोजचा उदरनिर्वाह करणे अवघड जात होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाली एकटीच शाळेत गेली. शिक्षकांनी शिवमची विचारपूस केली. तेव्हा तिने सरांना घडलेल्या सर्व प्रकार सांगितला. सरांनी शुभमला घरी लवकर बरे व्हायला सांगितले. दुपारची सुट्टी झाली. सर्व मुले जेवण करायला जमा झाली. पण, शिवाली काय जेवण करत नव्हती हे पाहून निकिता तिच्याजवळ गेली आणि शिवालीला जेवणासाठी आग्रह करू लागली परंतु शिवाली बोलू लागली, "अगं निकिता तू जेवण कर मी माझा डबा आज आणलेला नाही". निकिता शिवालीची खास मैत्रीण होती आणि ती तिच्याशिवाय जेवायला तयारच नव्हती. निकिताच्या आग्रहाखातर शिवाली जेवायला तयार झाली आणि मित्र-मैत्रिणी सोबत जेवण करू लागली. तिने सर्वांना घरी घडलेला प्रकार सांगितला. थोडयावेळाने शिवाली जेवण करून बाहेर निघून गेली. पण ती खूप काळजीत होती. निकिताला आपल्या मैत्रिणीची अशी अवस्था बघवत नव्हती. तिने आपल्या मित्र-मैत्रिणींना जमा केले आणि सर्वांना संध्याकाळी सहा वाजता शिवालीच्या घरी भेटण्यासाठी बोलावले आणि त्यांना सर्वांना आपल्या घरी जो काही भाजीपाला उपलब्ध आहे तो घेऊन यायला सांगितले. 

सर्वजण बरोबर संध्याकाळी शिवाली आणि शिवम च्या घरी पोहोचले. खाटेवर शुभम झोपला होता आणि आई त्याच्या डोक्यावरच्या पट्ट्या बदलत होती. शिवाली त्यांच्या शेजारी उभी होती. आपले मित्र-मैत्रिण आलेले पाहून तिने सर्वांना पाणी दिले आणि बसण्याची विनंती केली. सर्वांनी आपल्या मित्राची विचारपूस केली व शाळेतील गप्पा थोड्यावेळ रंगल्या. शिवमलाही त्यांच्यासोबत थोडे बरे वाटले. आता संध्याकाळ व्हायला लागली होती. मध्येच एक जण बोलला, "चला आपण आपल्या घरी निघूयात कारण, माझे आई-बाबा कामावरून घरी येत असतील". तेवढ्यात निकिताने विशालला इशारा केला आणि सर्वांनी जमवून आणलेला भाजीपाला शिवालीला दिला. त्यामध्ये कोणी वांगी, कोणी बटाटे, कोणी मिरच्या तर कोणी टोमॅटो घेऊन आले होते आणि सर्वांनी स्वतः जवळचे खाऊचे पैसे जमवून आणले होते. ते पैसे सर्वांनी शिवाली आणि शिवम च्या आईच्या हातात दिले आणि म्हणाले, "काकू चार दिवसांनी पुन्हा शिवमला दवाखान्यात न्यायचे आहे ना... तेव्हा हे पैसे कामी येतील. एवढ्या छोट्या मुलांचे एवढे मोठे सहकार्य पाहून शिवालीची आई भारावून गेली आणि तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू ओघळू लागले. तिला मुलांचे आभार व्यक्त कसे करावे तेच समजत नव्हते. तिने फक्त एकच आशीर्वाद दिला पोरांनो खूप खूप मोठे व्हा, पैशांनी नाही तर विचारांनी. 


मुलांनो या गोष्टीतून आपण काय शिकलात तर आपली एखादी छोटीशी मदत कोणाच्यातरी आयुष्यात आनंद आणू शकते. 


अजून मराठी गोष्टी वाचा:


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या