चिंकी आणि गुलाब मराठी गोष्ट | marathi story for kids

चिंकी आणि गुलाब मराठी गोष्ट | Marathi Story for Kids


Marathi stories for kids
Marathi stories for kids


नमस्कार मित्रांनो, मनातलं कागदावर- मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये आपणास मराठी कविता , मराठी कथा तसेच मराठी शुभेच्छा फोटो डाउनलोड करण्यासाठी मिळतील. 


Marathi Story for Kids -  चिंकी आणि गुलाब आज आकाशात ढग दाटून आले होते. वाराही जोरजोरात सुटला होता. पक्ष्यांचा थवा घरट्याकडे निघाला होता. आज चिंकी मात्र नाराज होती. एखाद्या बटरासारखी टम् फुगली होती कारण, तिचे आणि तिच्या दादांचे भांडण झाले होते. आईसुद्धा चिंकीवर ओरडली होती. चिंकींला वाटत होते, " माझ्यावर कुणाचेच प्रेम नाही. सगळे मलाच ओरडतात ! दादा पण मला मारतो आणि आई मला म्हणते, की तु खोडकर आहेस. मी आता कुणाशीच बोलणार नाही. संध्याकाळी बाबा येतील तेव्हा सर्वांचे बाबांना नाव सांगणार ", असा मनात विचार करत खट्टू होऊन अंगणातील कोपऱ्यात बसली होती. 

अचानक तिचे लक्ष बागेतील त्या सुंदर गुलाबाच्या फुलांकडे गेले. गुलाबाचे फुल मस्त मजेत वाऱ्याबरोबर खेळत होते. वाऱ्याला साथ देत होते. वाराही त्याला गुदगुल्या करत होता. त्या सुंदर गुलाबाच्या फुलांकडे पाहून चिंकींला फुलाचा हेवा वाटला. चिंकी गुलाबाच्या फुलांजवळ गेली आणि त्याच्याशी बोलू लागली, " फुला...ये सुंदर फुला... तुझी किती मज्जा आहे. तु किती मज्जा करतो आहे. वाऱ्यासह खेळतो आहे. तुला कधीच तुझी आई ओरडत नाही नि अभ्यास करायला पण सांगत नाही. तुझी किती मज्जा आहे. तुझं तुझ्या भावंडांजोडीला सुद्धा भांडण नाही होत. खरं सांगु का? मला देखील तुझ्यासारखे फुल व्हायला आवडेल. सुंदर असे. ज्याला मनसोक्त हसता येते. वाऱ्यासोबत गाता येते. "


अजून मराठी गोष्टी वाचा -
चिमुकले कोरोना योद्धे
हुशार मुंग्या
गुलाबाचे फुल चिंकीचे बोलणे शांतपणे कान लावून ऐकत होते. आता चिंकींला शांत होताना पाहून फुल बोलु लागले, " हो बरोबर आहे चिंकी आज मी खुप आनंदात आहे. बघ ना आज किती सुंदर वातावरण निर्माण झाले आहे. अगदी पाऊस पडण्यासारखे. गार गार वारे सुटले आहे. अंगावर शहारे येत आहेत. सुखाचे पण आणि दु:खाचे पण. रिमझिम पडणारा पाऊस मला खुप हवाहवासा वाटतो पण जोराचा पाऊस पडला की मला फार त्रास होतो, रपरप करून माझ्या अंगावर आदळतो. तेव्हा मला फार रडू येते. कधी कधी क्षीण होऊन माझ्या सर्व पाकळ्या गळून जातात. तर कधी रखरखत्या उन्हामध्ये करपून जातात. मलाही उन्ह जास्त पाऊस जास्त चालत नाही आणि हो वारासुद्धा. मला सर्व गोष्टी प्रमाणातचं लागतात. एखादी जरी गोष्ट जास्त झाली तरी मी गपकन् खाली पडून मरून जाईल. जसे तुला सुख, दु:ख, आनंद होतो तसा मलाही होतो. पण तरी मी आनंदाने जगायला शिकली आहे. आनंदाने मी माझ्या आयुष्याचे गाणे गात असते आणि हा निसर्ग मला साथ देत असतो. "

चिंकींला फुलाचे बोल फार भावले व तिने हसून फुलाला स्पर्श केला आणि हाताने फुलांची पापीचं घेतली. कारण आता तिला समजले दादाने मला मारले कारण मी त्याची वही फाडली होती आणि ती वही खुप महत्त्वाची होती. ही तर माझीच चुक होती आणि मी सर्वांना वाईट समजत होते. मला किती उबदार सुंदर घर आहे तसे घर या फुलांला पण नाही मी तर सर्वांची लाडकी परी आहे. आता मी नाही रुसणार. तेवढ्यात आईने आवाज दिला, " चिंकी घरात ये बाहेर पाऊस सुरू झाला आहे ". तेवढ्यात चिंकींला लांबून बाबा येताना दिसले आणि चिंकी धावत बाबाकडे गेली आणि बाबांच्या हातातील खाऊची पिशवी स्व:ताकडे घेतली आणि ऐटीत चालू लागली. इकडे फुल मात्र हसत चिंब भिजत पावसात चिंकी कडे पाहु लागले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या