आपण सगळे एक समान मराठी गोष्ट | Marathi Goshti

आपण सगळे एक समान मराठी गोष्ट | Marathi Goshti


नमस्कार माझ्या बालमित्रानों, 
आज आपण वाचणार आहोत, एक सुंदर अशी मराठी गोष्ट . गोष्टीचे नाव आहे आपण सगळे एकसमान


Marathi story for kids- आपण सगळे एकसमानMarathi stories for kids | marathi goshti
Marathi goshti


रावी एक अतिशय हुशार मुलगी होती तिला सतत प्रश्न पडत असतं आणि प्रश्नाचे उत्तर शोधल्याशिवाय ती शांत बसत नसे. आई बाबांना प्रश्न विचारून ती भांडावून सोडत असे. फिरायला गेले की ती खूप प्रश्न विचारत असतं आणि बाबा तिला खूप शांतपणे समजावून सांगत असतं. ती सर्वांची लाडकी होती आणि समजूतदार तेवढीच होती. 


Marathi stories for kids | marathi goshti
Marathi stories for kidsएकदा काय झाले. रावीच्या बाईंना वर्गांत यायला थोडा उशीर होणार होता. तेव्हा बाईंनी पार्थ जवळ निरोप पाठवला. "मी थोडी वर्गात उशिरा येणार आहे, सर्वांनी अभ्यास करत बसा".बाई एकदम कडक शिस्तीच्या असल्या कारणांमुळे बाईंचा निरोप सर्वांनी ऐकला व शांतपणे सर्वजण अभ्यास करू लागले. कोणी गणिते सोडवू लागले, कोणी चित्र काढू लागले, तर कोणी मनातले मनात कविता म्हणू लागले. 

थोडा वेळ निघून गेला. बाईंनी वर्गात प्रवेश केला. सर्वजण एकदम शिस्तीत बसलेले पाहून बाईंना जरा हायसे वाटले. बाई म्हणाल्या, "शाब्बास मुलांनो, खूप गुणी आहेत माझी मुले...सर्व किती शांतपणे अभ्यास करत बसले आहेत. अगदी शहाण्या मुलांसारखे. चला सांगा बरे मला कोणी कोणी काय काय अभ्यास केला". प्रत्येक जण सांगू लागला, "बाई मी कविता वाचली, कोणी म्हणे बाई मी चित्र काढली, कोणी म्हणे मी गोष्ट वाचली". प्रत्येक जण काही ना काही सांगत होता बाईंचे लक्ष रावीकडे गेले आणि रावी कशात तरी रमल्यासारखी वाटत होती. 


Marathi stories for kids | marathi goshti
Marathi goshti
बाईंनी रावीला विचारले, "रावी तू काय अभ्यास केलास"?  त्यावर रावी बोलली, "बाई मी चित्रे पाहत होते पुस्तकांमधील. बाई म्हणाल्या, "हो छान ! छान !" तेवढ्यात रावी बोलली, "पण बाई मला त्यामधील एक चित्र काही समजले नाही. त्यामध्ये बाबा भाजी साफ करत आहेत. आई ऑफिसला गेली आहे. गणू नावाचा एक मुलगा झाडू मारत आहे. कसं काय...? आमच्या घरी तर आई भाजी साफ करत असते. बाबा ऑफिसला जात असतात". त्यावर बाईंच्या लक्षात सर्व प्रकार आला. 

बाई गालातल्या गालात हसल्या आणि म्हणाल्या, "अरे ! रावी ती चित्रे आहेत आणि ती चित्रे आपल्याला दर्शवत आहेत की, आपण सर्व एक समान आहोत. आपण सर्वजण सर्व कामे करू शकतो. बाबा ही भाजी साफ करू शकतात आणि आई ऑफिसला जाऊ शकते. 


Marathi stories for kids | marathi goshti
Best Marathi storiesतेवढ्यात पार्थ उभा राहिला व बोलू लागला. "आमच्या घरी माझी आई ऑफिसला जाते आणि माझे बाबा माझी काळजी घेत असतात. ते लेखक आहेत ना. मग ते घरीच असतात. बाबा माझ्याशी खूप खूप खेळतात आणि माझ्यासाठी खाऊ सुद्धा बनवतात. आम्ही मस्त मस्त बनवून खातो ". बाई हे सर्व ऐकत होत्या आणि पुन्हा रावीच्या प्रश्नाकडे वळाल्या. पण आता रावीला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. तिने मनात लगेचचं विचार केला. आई रविवारी आजीला भेटायला जाणार आहे आणि ती बोलत होती की, तिला संध्याकाळ होईल. त्या दिवशी घरी यायला. बाबा आणि मी छान छान तिच्यासाठी जेवण बनवणार आणि आईला सरप्राईज देणार. रावी आता भलतीचं खुश झाली होती. 

मुलांनो या गोष्टीतून आपण काय शिकलात. तर मुलगा मुलगी एक समान, स्त्री पुरुष एक समान... म्हणजेचं आपण सगळे एक समान ! अजून मराठी गोष्टी वाचा. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या