Marathi story for kids | धाडसी मिनू आणि चिनू

Marathi story for kids | धाडसी मिनू आणि चिनू 


नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत छोट्या धाडसी मिनू आणि चिनूची मराठी गोष्ट (Marathi story for kidsMarathi story for kids | धाडसी मिनू आणि चिनू
Marathi story for kidsमराठी गोष्ट - धाडसी मिनू आणि चिनूएक छोटेसे गाव होते. त्या गावांमध्ये एक शेतकरी कुटुंब राहत होते. मिनू आणि चिनू या दोघी बहिणी होत्या. एकदम खेळकर आणि मस्तीखोर मिनू आणि चिनूचे एकमेकींशिवाय पान हालत नसे. दोघींही कायम एकत्र अगदी एखाद्या मैत्रिणीसारख्या. 

एकदा काय झाले आई-बाबा दोघेही शेतात गेले आणि आपल्या घरातील अंध आजीकडे लक्ष द्यायला सांगितले. तसेही रोज त्या व्यवस्थित आजीची काळजी घेत असतं, अगदी आजीच्या हाकेला उभे राहत असत! आजीची खूप काळजी घेत. त्यांनी आई-बाबांकडून ऐकले होते की, आजीने फार तिच्या तरुणपणी कष्ट केले आहेत. अनवाणी पायांनी खूप काम करत असे संपूर्ण संसाराचा गाडा ती एकटी ओढत असे. तिच्या या कष्टामुळे तिला कमी वयातच अंधत्व आले होते. 

मिनू आणि चिनू आजीला जेवायला देत, पाणी प्यायला देत, आजीची सर्व कामे अगदी उड्या मारून करत असतं. एके दिवशी काय झाले मिनू आणि चिनू शाळेतून दुपारी घरी आल्या. बाहेर कडकडीत ऊन पडले होते. पक्षी आवाज मोठ- मोठ्याने करत होते. लांब मिनू आणि चिनूचे मांजर कोणाशी तरी झुंजत होते आणि आजी तिथे झाडाखाली बसली होती. नातींची शाळेतून घरी येण्याची वाट बघत होती. मिनू आणि चिनूने आजीकडे धाव घेतली. 

दोघीही आधी जवळ आल्या आणि आजीला म्हणाल्या, "आजी आत मध्ये चल झाडाखाली फार ऊन यायला लागले आहे, चल आम्ही तुला पकडून नेतो". लगेच शेजारील काठी आजीच्या हातात दिली आणि दोघींनी आजीचा हात धरला आणि चालू लागल्या. आजी सोबत चालु लागल्या. तोच चिनूचे लक्ष पायरीवर सुस्त पडलेल्या सापाकडे गेले. चिनू घाबरली आणि मिनूला व आजीला बोलली, "थांबा थांबा पुढे जाऊ नका".मीनूचेही लक्ष पायरीवर पडलेल्या त्या सापाकडे गेले. दोघी एकदम घाबरल्या आणि आता काय करावे त्यांना समजेना. तेवढ्यात मिनू आजीला घेऊन मागे आली आणि चिनूला बोलली, "चिनू लवकर जा, शेजारील काका घरात झोपले असतील, त्यांना बोलावून आण. मी आजीजवळ थांबते".चिनूने आजीचा हात सोडला आणि पळत पळत जावून शेजारील काकांना बोलावून आणले. 

काका ही धावत धावत चीनू सोबत आले आणि समोर पडलेले ते लांबलचक अजगर पाहून खूपच घाबरले. त्यांनी तुरंत आपल्या शेजारील गावातील सर्पमित्रला फोन केला. सर्पमित्रही त्याच गावात आलेला असल्यामुळे लवकरच तो तिथे दाखल झाला. तोपर्यंत अर्धा गाव तिथे गोळा झाला होता. सापाने  काहीतरी गिळले होते म्हणून तो शांत इतक्या वेळ पडला होता. पण त्याचा एवढा मोठा लांबलचकपणा पाहून कोणीही त्याच्या जवळ जायची हिंमत करत नव्हते. 

सर्प मित्रांने त्याची कला आजमावून सापाला त्याच्या एका मोठ्या बरणीत भरले आणि तिथून तो निघून गेला. आता सर्व गावाच्या कुठे जीवात-जीव आला होता. मिनू आणि चिनूच्या हुशारीची सर्वत्र गावात चर्चा रंगू लागली होती. संध्याकाळी आई बाबा शेतातून घरी आले. मिनू आणि चिनूने घडलेल्या प्रकार आई-बाबांना सांगितला. बाबांनी दोघींच्या पाठीवर शाब्बासकी दिली. "माझ्या मुली फारच धीट आहेत", असे म्हणाले आणि आजीच्या रूममध्ये आजीची विचारपूस करायला निघून गेले. 


आपण या गोष्टीमधून काय शिकलात मुलांनो तर, संकटांना नेहमी धीटपणे सामोरे जावे. अजून मराठी गोष्टी तसेच कविता वाचा :
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या